Ad will apear here
Next
पालघर जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा
पालघर : पालघर जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा १२ जून २०१७ रोजी अध्यक्षा श्रीमती सुरेखा थेतले यांच्या अध्यक्षतेखाली पंचायत समिती सभागृहात घेण्यात आली. सर्व समित्यांचे सभापती, सदस्य, मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती निधी चौधरी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री. एन. के. जेजुरकर, तसेच सर्व विभागांचे खातेप्रमुख या वेळी उपस्थित होते. अध्यक्षांच्या मार्फत सर्वप्रथम दुखवट्याचे व अभिनंदनाचे ठराव सभागृहात मांडण्यात आले. त्यानंतर अनेक विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. पालघर जिल्हा परिषदेच्या जनसंपर्क अधिकारी मनीषा निरभवणे यांनी त्याबद्दलची माहिती दिली आहे.

सर्वसाधारण सभेत चर्चा झालेले मुद्दे :

- डॉ. बाबासाहेब आंबेडकर एकात्मिक आंतरजातीय विवाह योजनेंतर्गत आंतरजातीय विवाह केलेल्या पाच जोडप्यांचा ५० हजार रुपयांचा धनादेश देऊन सत्कार करण्यात आला. 
- स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत शौचालय बांधकाम करण्यात आलेल्या कुटुंबांचे फोटो केंद्र सरकारच्या वेबसाइटवर अद्ययावत करण्याचे काम १०० टक्के पूर्ण केलेल्या शिरवली ग्रामपंचायत (ता. वसई) आणि गोवाडे ग्रामपंचायत (ता. पालघर) येथील ग्रामसेवकांचा सन्मानपदक देऊन सत्कार करण्यात आला. 
- प्राथमिक शिक्षण विभागामार्फत शाळेच्या पहिल्या दिवशी प्रवेशोत्सव राबविण्यात येणार आहे. गुढी उभारून विद्यार्थ्यांना गोड जेवण देण्यात येणार आहे आणि वृक्षलागवड करण्यात येणार आहे. तसेच शाळा स्तरावर स्वच्छता प्रश्नावली मतदान घेण्यात येणार आहे. त्यामुळे मतदान प्रक्रियेबाबत मुलांमध्ये जागरूकता निर्माण होण्यास मदत होईल. या उपक्रमात लोकप्रतिनिधींना सामावून घेण्यात येणार आहे.
- माध्यमिक शिक्षण विभागामार्फत अनधिकृत २३ शाळांची यादी प्रसिद्ध करण्यात आली. या शाळेत आपल्या मुलांना न घालण्याचे आवाहन करण्यात आले.
- कुपोषण निर्मूलनाकरिता १५ आरोग्य अधिकाऱ्यांची भरती जिल्हा परिषद सेस फंडातून करण्यात आली. 
- कार्यकारी अभियंता (लघु पाटबंधारे) म. ना. राजभोज यांची बदली मुंबई उपविभागात झाल्याबद्दल शाल-श्रीफळ देऊन त्यांचे अभिनंदन करण्यात आले.
- डॉ. अजित हिरवे यांची जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी म्हणून नेमणूक झाल्याबद्दल स्वागत करण्यात आले.  
- महावितरण कार्यकारी अभियंता श्री. डोंगरे यांच्यामार्फत सर्व उपस्थितांना जिल्ह्यातील वीज वितरणाबाबत माहिती  देण्यात आली. पावसाळ्यासाठी विशेष उपाययोजना करून ट्रान्स्फॉर्मर दुरुस्तीची काम वेगाने सुरू करण्याबाबत संगण्यात आले. 
- सूर्या नदी प्रकल्पाबाबत पालघर पाटबंधारे विभागाचे प्रकाश संखे यांच्याबरोबर सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच मोखाडा आणि जव्हार तालुक्यातील पाणीपुरवठा योजनेबाबत एकत्र बैठक आयोजित करण्याबाबत सुचवण्यात आले.
- वीज यंत्रे सर्व शाळांत बसविण्याबाबत ठराव घेण्यात आला. 
- सामान्य प्रशासन विभागामार्फत ‘आनंदी निवृत्त दिन’ या उपक्रमाबाबत माहिती देण्यात आली  यात निवृत्त अधिकारी आणि कर्मचारी यांना निवृत्तीच्या वेळी सर्व आवश्यक लाभ तत्काळ देण्यात येतील अशी माहिती देण्यात आली. 
- भाभा अणुसंशोधन केंद्राच्या अणुऊर्जा केंद्रात झालेल्या अपघाताची दखल घेऊन हे प्रकरण पंतप्रधान कार्यालयास कळवण्यात यावे, असे सुचवण्यात आले.
- पालघर जिल्ह्याच्या नवीन प्रशासकीय इमारतीबाबत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांमार्फत सर्व सदस्यांना माहिती देण्यात आली.  
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/MZLOBD
Similar Posts
आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना आर्थिक मदत पालघर : समाजातील जातिभेद व असमानतेची दरी दूर करून समाज एकसंध व्हावा, या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर एकात्मिक आंतरजातीय विवाह योजनेंतर्गत ६३ जोडप्यांना ५० हजार रुपयांचा धनादेश पालघर जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागामार्फत प्रदान करण्यात आला.  या कार्यक्रमाला जिल्हा
पालघरमध्ये योगदिनी विविध उपक्रम पालघर : योगसाधना हे भारताने जगाला आनंदी व निरोगी जीवन जगण्यासाठी दिलेले एक मोठे वरदान आहे. योग ही शारीरिक, मानसिक, आध्यात्मिक साधना असून, यामुळे मानवी जीवन समृद्ध होऊन शरीर व मनात परिवर्तन घडवून आणते. भारतातील पाच हजार वर्षे जुन्या असलेल्या या साधनेला आता आंतरराष्ट्रीय मान्यता मिळाली आहे. कारण तीन
पालघर जिल्हा परिषदेत स्वातंत्र्यदिन साजरा पालघर : स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून, पालघर जिल्हा परिषदेच्या प्रांगणात स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी पालघर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष सुरेखा थेतले यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले. सदर प्रसंगी स्वच्छता आणि संकल्पातून सिद्धीकडे नवभारत चळवळ २०१७ ते २०२२ ची प्रतिज्ञा घेण्यात आली
हत्तीरोगविरोधी एकदिवसीय औषधोपचार मोहिमेबाबत समन्वय समितीची बैठक पालघर : हत्तीरोग निर्मूलनासाठी महाराष्ट्रातील १७ जिल्ह्यांमध्ये सामुदायिक औषधोपचार मोहीम २६ जुलै ते ३० जुलै या कालावधीत राबविण्यात येणार आहे. या संदर्भात पालघर येथे २० जुलै रोजी जिल्हा समन्वय समितीची बैठक मुख्य कार्यकारी अधिकारी निधी चौधरी यांच्यामार्फत घेण्यात आली. यात या मोहिमेतील नियोजनाचा आढावा घेण्यात आला

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language